दापोली : शहरातील दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए.जी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

पीसीएम गटात रोहित शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात ९८.९५ पर्सेंटाईल मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे, तर पीसीबी गटात सानिका गुढेकर हिने ९८.९६ पर्सेंटाईल प्राप्त करत उत्तम कामगिरी केली आहे.

याशिवाय पीसीएम गटात तन्मय शेवडे आणि मुग्धा मोहिते यांनी प्रत्येकी ९६.८१, वरून माने याने ९४.८४, गौरव गुरव याने ९२, श्रुती खोचरे हिने ९०.७० आणि आर्यन घारपुरे याने ९०.११ पर्सेंटाईल मिळवले आहेत.

पीसीबी गटात सानिका गुढेकर सोबतच श्रुती खोचरे हिने ९६.४५ आणि सफा मुकादम हिने ९३.७३ पर्सेंटाईल मिळवत शाळेच्या यशात भर घातली आहे. इतर अनेक विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने दापोली एज्युकेशन सोसायटीने राबवलेल्या विशेष उपक्रमामुळे हे यश साध्य झाले आहे.

दर्जेदार शिक्षण, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा आणि शंका निरसन सत्रांचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. या परीक्षेसाठी आयडियल कोचिंग क्लास नाशिकचे तज्ज्ञ मार्गदर्शक विष्णू पिंगळे, निखिल कुलकर्णी आणि निलेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच ए.जी. हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक संदीप कान्हेकर, ओंकार पाठक, हेमंत कुलकर्णी, प्रशांत मोहिते, मानसी अभ्यंकर, राहुल विरकर, कल्पेश तलाठी, पुनम गायकवाड, अनुप्रिता सावर्डेकर आणि संध्या सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद करमरकर, सचिव विनोद जोशी, शालेय समिती अध्यक्ष रवींद्र कालेकर, सदस्य स्मिता सुर्वे आणि सर्व संचालक मंडळाने कौतुक केले आहे. दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे