दापोली : शहरातील केळसकर नाका आणि हर्णे बायपास परिसरातील निसर्ग हॉटेलसमोरील रस्त्यावर बेकायदा जमाव केल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास व २८ मे रोजी रात्री १:१५ वाजण्याच्या सुमारास हर्णे बायपास येथे रमेश खोपटकर, रवींद्र बोरकर, दत्तात्रय शंकर धाडवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या १०० ते १५० लोकांनी रस्त्यावर टायर जाळून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. या जमावाने बेकायदेशीररीत्या एकत्र येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अटकाव केला आणि वाहने अडवली.
तसेच, २७ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास दापोलीतील केळसकर नाका येथे मयूर लहू मोहिते, संदीप राजाराम गायकवाड, राजा पटेल, राकेश प्रवीण भांबेड, सचिन सावंत, संजय सदानंद रहाटे, ओमकार वेल्हाळ, अमित साळवी, बापू लिंगावळे, प्रणव रेळेकर, बाक्कर, अमरीश हेदुकर, राकेश माळी आणि त्यांच्यासोबतच्या ३०० ते ३५० लोकांनी जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव केला.
या जमावानेही रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना जाणीवपूर्वक अटकाव केला. याप्रकरणी या सर्वांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

