रत्नागिरी : येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये २१ मे २०२६ रोजी “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” साजरा करण्यात आला.

भारतात दरवर्षी २१ मे हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संपूर्ण देशात शांतता, अहिंसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पाळला जातो.

युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य केतनकुमार जे. चौधरी यांनी, दहशतवाद हा मानवतेसाठी घातक असून समाजातील सौहार्द आणि विकासासाठी ते एक गंभीर आव्हान असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय हिताच्या जाणीवा अधिक दृढ होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक उत्तरदायित्व आणि शांततेच्या मूल्यांविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.