रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक १६/०२/२०२१ ते २५/०२/२०२१ या १० दिवसांच्या कालावधीत शेळीपालन विषयाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शेळीपालन व्यवसायाचे उद्देश, शेळीपालनाचे फायदे, व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी, शेळ्यांची निवड, संगोपनाच्या विविध पद्धती, शेड व्यवस्थापन, लसीकरण, शेळ्यांना होणारे आजार व त्यावरील होमिओपॅथी आणि घरगुती उपाय, विंचू दंश व त्यावरील उपाय योजना, पोटातील जंत तसेच गोचीडवरील उपाय योजना, शेळीचा आहार, नोंदवही, मार्केट व्यवस्था, संगोपन करत असताना घ्यावयाची काळजी आणि विमा इ. प्रकार प्रात्यक्षिकासह शिकविले जाणार आहेत.
सदर प्रशिक्षण हे मोफत असून चहा,नाष्टा,जेवण व निवास व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी दिनांक १२/०२/२०२१ पर्यंत नोंदणी केली जाईल. सदर प्रशिक्षणासाठी १८ ते ४५ वयोगटातील रत्नागिरी जिल्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणासाठी ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी येताना १ फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स,पॅन कार्ड झेरॉक्स,शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स घेवून येणे.
कार्यालयाचा पत्ता – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. मोबाईल क्र. ९२८४०३४४३८