रत्नागिरी : चरवेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी लेले यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.

स्मिता लेले या पूर्वी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव, सामाजिक कार्याची ओढ आणि प्रामाणिक कार्यपद्धती पाहून ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर सरपंचपदाची जबाबदारी सोपवली आहे.

सरपंचपदी निवड झाल्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थपणे काम करण्याचा निर्धार लेले यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.