दापोली : ‘प्लास्टिक मुक्त दापोली’ हे ध्येय समोर ठेवून जेसीआय दापोली आयोजित ‘जेसीआय चषक २०२६’ ही क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली.
या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा कृपा घाग, साधना बोत्रे, श्रीराम इदाते आणि जेसीआय दापोली अध्यक्ष कुणाल मेहता यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या सोहळ्याचे औचित्य साधून बहुजन हिताय विद्यामंदिर (आगरवायंगणी) आणि रामराजे स्कूल अँड कॉलेज (दापोली) यांना सॅनिटरी डिस्पोजेबल मशीन प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

या स्पर्धेत एकूण १९ संघांनी सहभाग घेतला होता. चुरशीच्या अंतिम सामन्यात इमाद पॅकर्स संघाने विजेतेपद पटकावले, तर सनी कोंड (दापोली) संघ उपविजेता ठरला.
वैयक्तिक कामगिरीत इमाद पॅकर्सच्या ओसामाने मालिकावीर आणि सर्वोत्तम फलंदाज म्हणून बहुमान मिळवला. तसेच अमितने सर्वोत्तम गोलंदाज, तर जतिन साळगावकर याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक पटकावले.
बक्षीस वितरण समारंभास कृपा घाग, साधना बोत्रे, जयवंत जालगांवकर, राजू घोसाळकर, राहुल राठोड, मिलिंद शेठ, कुणाल मेहता आणि अतुल गोंदकर उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी कागदी व कापडी पिशव्यांचे वाटप, एसटी कर्मचारी व रिक्षाचालकांना स्टील बाटल्यांचे वाटप आणि बीच स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी कुणाल मेहता, बासीत देशमुख, तेजस मेहता, रोशन वेदक, रुषी शेठ, अद्नान मुकादम, रुषी तलाठी, भूषण इसवलकर, कुणाल मंडलिक, स्वप्नील मेहता, अनिकेत खानविलकर आणि फराझ रखांगे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

