दापोली: कुडावळे ते दापोली मार्गावर बोंडीवली येथील साईबाबा मंदिराजवळील वळणावर भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी किरण मधुकर कोळंबेकर (वय ३५, रा. बोंडीवली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

२२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या धडकेत सिद्धी सुधाकर कमळकर (वय २२) आणि श्वेताली सुधाकर कळमकर या दोन तरुणी जखमी झाल्या आहेत.

सिद्धी कमळकर ही आपली ॲक्टिव्हा स्कुटी (क्रमांक MH 08 Q 2059) घेऊन जात असताना, आरोपी किरण कोळंबेकर याने आपल्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे समोरून आणली आणि सिद्धीच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये दोन्ही बहिणींच्या दुखापतीला आणि स्वतःच्या दुखापतीला आरोपी कारणीभूत ठरला आहे.

याप्रकरणी सिद्धी कमळकर हिने दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.