
रत्नागिरी: कोकणातील महिलांचा शाश्वत विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती हा एक प्रभावी मार्ग आहे. रत्नागिरीतील शिरगाव येथे नुकतेच ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’, ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन’ आणि ‘आसमंत फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मत्स्य पदार्थ निर्मिती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. पकडलेल्या मासळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यास मच्छिमारांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला संजय भावे, राजेश ठोकळ आणि प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रशिक्षणादरम्यान तिवंडेवाडी, बसणी, शिरगाव आणि काळबादेवी येथील एकूण ६९ महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये कोलिम चटणी, कोळंबी लोणचे, कालवांचे लोणचे, बोंबील चटणी आणि मत्स्य चकली यांसारखे पदार्थ बनवण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अपूर्वा सावंत, वर्षा सदावर्ते, मनोज घुगुस्कर, नरेंद्र चोगले, तेजस जोशी, प्रशांत पिळणकर, सचिन साटम, समृद्धी सनगरे आणि सृष्टी यांनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी डोंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदिनी शेटये यांनी केले. सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सोनाली शिवलकर यांनी प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

हे सत्र यशस्वी करण्यासाठी निलेश मिरजकर, राकेश जाधव, सुशील कांबळे, रोहित बुरटे, पंकज सिडाम, संदेश चव्हाण, प्रवीण गायकवाड, केतन चव्हाण यांच्यासह जलजीविका आणि लोककल्प फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply