पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली शहर येथे पोलिस मित्र संघटना कार्यकारीणी स्थापन करण्यात आली आहे.पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी हे नविन पोलिस मित्र त्यांना मदत करणार आहेत, कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या या कोरोना योध्यांबरोबर आता पोलिस मित्र सुद्धा या योध्यांना मदत करणार आहेत.

ईद, दहिहडी, १५ ऑगस्ट, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, सार्वजनिक निवडणुका या काळात पोलिसांसोबत रात्री गस्त घालणे, तसेच वाहतूक रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करणे, समाजातील चुकीच्या गोष्टींविषयी पोलिसांना माहिती देणे, बेवारस वस्तू यांची माहिती देणे, पोलिस कुटुंबियांचे कल्याणार्थ सेवा पुरविणे व उपक्रम राबविणे यासारखी कामे हे पोलिस मित्र विनामोबदला समाजसेवेच्या आवडीपोटी करणार आहेत.

पोलिस प्रशासनाच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत, तरी मदतीसाठी आम्हाला सुध्दा तुमच्यासोबत मदतीला घ्या या आशयाचे निवेदन दापोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. त्या प्रसंगी पो.नि. राजेंद्र पाटील यांनी सदर कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवेदन सादर करते वेळी पोलिस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शादाब जिलानी, अध्यक्ष- निखिलेश चव्हाण, उपाध्यक्ष – राहील मुरूडकर, महेंद्र खैर, सुहेल काद्री कार्याध्यक्ष संतोष क्षीरसागर, प्रशांत शिंदे, दापोली तालुका सचिव – विनोद महाडिक, सहसचिव – अरबाज अब्बास मिया तांबे, खजिनदार – शकील हसनमिया चिपळूणकर, संपर्क प्रमुख – सलमान रफिक मुकादम, सह संपर्क प्रमुख – संदेश शिवाजी लिंगावळे उपस्थित होते.