दापोली : सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्यावतीने आणि रत्नागिरी तायक्वॉंडो स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेसाठी रत्नागिरी तायक्वॉंडो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा यांनी परीक्षक म्हणून उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात अकॅडमीच्या अध्यक्ष प्रिती दाभोळे, उपाध्यक्ष प्रदीप राजपूत, सचिव प्रथमेश दाभोळे, सहसचिव महेश्वर जाधव, खजिनदार श्रद्धा दाभोळे, सदस्य शैलेश मिसाळ आणि मंगेश गोडसे उपस्थित होते. परीक्षा संपन्न झाल्यानंतर आयोजित बेल्ट वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी केदार साठे, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्रीराम इदाते, दापोली तालुका अध्यक्षा व नगरसेविका जया साळवी, दापोली तालुका माजी अध्यक्ष संजय सावंत, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष धिरज पटेल तसेच पालक प्रतिनिधी अमृते उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बेल्ट प्रदान करण्यात आले.

दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रसाद करमरकर यांनी सर्व खेळाडूंना अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाने खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला असून, तायक्वॉंडो खेळाच्या प्रचार आणि प्रसाराला चालना मिळाली आहे.