दापोली : मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा आज, शुक्रवारी नियोजित आहे.

या दौऱ्यात ते दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मंदिरात सायंकाळी ५.०० वाजता आयोजित धर्म सभेला उपस्थित राहणार आहेत.

या सभेचे आयोजन स्थानिक समुदायाने केले असून, यावेळी धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

आज दुपारी २.०० वाजता ते दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हेलिपॅडवर पोहोचतील. यानंतर, सायंकाळी ४.०० वाजता हर्णे बंदर आणि ४.३० वाजता अडखळ जेटी येथे कोळी बांधवांशी चर्चा करतील.

सायंकाळी धर्म सभेनंतर सायंकाळी ६.०० वाजता ते अडखळ येथील पिढीतांशी चर्चा करतील आणि ६.३० वाजता उत्तम आंबेकर, विभाग कार्यवाह यांची भेट घेतील.