दापोली : शहरातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचकाडून महिला महाविद्यालयाची मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून बी.ए., बी.एस्सी. आणि बी. कॉम. या विभागांना मान्यता मिळाली आहे. दापोलीमध्ये फक्त महिलांसाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू करणारं हे जिल्ह्यातील पहिलं महाविद्यालय ठरलं आहे. लवकरच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. स्त्री कुटुंबाचा आस असते. संपूर्ण कुटुंब तिच्याभोवती फिरत असतं. शिक्षणच स्त्रीउद्धाराचं व समाज परिवर्तनाचं साधन आहे. मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. एक आई आपल्या मुलाचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणीवर्गात घेतला जाऊ शकत नाही.
सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी दापोलीत नेहमीच मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही राहीली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहिलेच अल्पसंख्याक महिला महाविद्यालय म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. महाराष्ट़ाचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, भय्या सांमत साहेब, हुसैन दळवाई, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार सुर्यकांत दळवी, माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांच्या प्रयत्नामुळे व मोलाच्या मार्गदर्शनामुळे महिला महाविद्यालयास मान्यता मिळालयाचं संस्थेचे सेक्रटरी इकबाल परकार यांनी सांगितले. तसेच सर्वांचे अभार मानले आहेत.
12 वी उत्तीर्ण, तसेच यापूर्वी 12 वी नंतर शिक्षण बंद केलेल्या मुलींना व महिलांना या निमित्त्नां शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे. अल्पसंख्याक महाविद्यालय म्हणून मान्यता असली तरी सर्व जाती धर्माच्या मुली व महिलांसाठी महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती मुस्लिम एज्युकेशन सोसायटीकडून देण्यात आली आहे.