दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पुन्हा दापोलीत हजर होणार, ही माय कोकणनं दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. दापोलीमध्ये पुन्हा एकदा हजर होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या ऑर्डरवर वरीष्ठांची सही झाली असल्यानं ते कधीही दापोलीत हजर होऊ शकतात. ‘माय कोकण’च्या माहितीनुसार ते शुक्रवारीच म्हणजे उद्या दिनांक 24 जुलै 2020 रोजी सूत्रं हाती घेणार आहेत.

महादेव रोगडे यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत पत्र

कोणाच्याही ध्यानी मनी नसताना महादेव रोडगे यांची अचानक बदली झाली. वसई-विरार महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू होण्याचे आदेश निघाले. परंतु ते तिथे हजर झालेले नाहियेत. कोरोनाच्या काळात दापोलीला अनुभवी व पूर्ण वेळ अधिकाऱ्याची आवश्यकता होती. अनेकांनी रोडगे यांनी जाऊ नये असा आग्रह ही धरला होता. त्यामुळे त्यांनी दापोलीमध्ये पुन्हा एकदा मुख्याधिकारीपदी हजर होण्याचं ठरवलं. बुधवारीच दापोलीत हजर होण्याचा प्रशासकीय मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी महादेव रोडगे दापोलीमध्ये हजर होण्याची शक्यता आहे.

दापोलीच्या पाण्याचा प्रश्न चांगल्याप्रकारे हाताळला होता. नारगोली धरण बांधल्यानंतर प्रथमच त्याची साफसफाई त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही घेतली होती.
महादेव रोगडे पुन्हा दापोलीत येणार असल्यामुळे दापोलीकरांना आनंद झाला आहे.