[wpedon id=”1120″]


रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 813 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 4, संगमेश्वर 5, उपजिल्हा रुग्णालय कामथे 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 1, आणि 33 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचं विवरण

जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – ११ रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 8 रुग्ण
दापोली – 4 रुग्ण
गुहागर – 1 रुग्ण
घरडा, खेड – 3 रुग्ण

बुरोंडी, दापोली येथील एका 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.तर मागल, लांजा येथील 56 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 44 झाली आहे.

तालुकानिहाय मृतांचा आकडा

रत्नागिरी – 8
खेड – 4
गुहागर – 2
दापोली – 11
चिपळूण – 8
संगमेश्वर – 6
लांजा – 2
राजापूर – 2
मंडणगड – 1

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 1336
बरे झालेले – 813
मृत्यू – 44
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 479

आज राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी, शेटये नगर, रत्नागिरी, पानवल बौध्दवाडी, रत्नागिरी, बौध्दवाडी सोमेश्वर, रत्नागिरी, शेलारवाडी सोमेश्वर, रत्नागिरी, रामेश्वरवाडी नाखरे, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 78, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 9, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 3, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -3, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 2, केकेव्ही, दापोली – 12 असे एकूण 108 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरंटाईन

मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 17 हजार 148 इतकी आहे.

13 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 14 हजार 892 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 14 हजार 349 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1336 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 13 हजार 1 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 543 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 543 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.

Advertise
Advt.