रत्नागिरी : जिल्ह्यात सीएससी केंद्र चालविण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी डीजीआर वेबसाईट (https://dgrindia.gov.in/) वर नोंदणी करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. स्पर्श प्रणालीत येत असलेल्या अडचणीसाठी सीएससी (Common service Centres) स्थापन करण्याबाबत कळविण्यात आले आहे.