रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. शुक्रवारी रात्री आणखी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८२६ इतकी झाली आहे.
कोरोनाचं संकट एवढ्यात तरी टळेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दर दिवशी ४० ते ५० रूग्ण आढळत आहेत. जिल्हा प्रशासनावरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
शुक्रवारी सापडलेल्या रूग्णांची आकडेवारी अशी आहे की, रत्नागिरी ११, कळंबणी ९, कामथे १८, दापोली ५ आणि गुहागरमधील ९ रूग्ण आहेत. या सर्वांना रूग्णालयामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.