दापोली : तालुक्यातील वेळवी, कलानगर येथील अमोल गुंदेकर या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली.
विश्वास गुंदेकर (राहणार कलानगर वेळवी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा अमोल याने वेळवीमधील कलानगर येथील जांभळीच्या ठिकाणी असलेल्या काजूच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. तो जिवंत असेल असे वाटल्याने विश्वास गुंदेकर यांनी त्याला तत्काळ खाली उतरविले व घरी घेऊन आले. अमोल याची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी याची खबर दापोली पोलिस ठाण्यात दिली. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस फौजदार बुरटे करीत आहेत.