दापोली : तालुक्यातील वेळवी, कलानगर येथील अमोल गुंदेकर या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली.
विश्वास गुंदेकर (राहणार कलानगर वेळवी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा अमोल याने वेळवीमधील कलानगर येथील जांभळीच्या ठिकाणी असलेल्या काजूच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. तो जिवंत असेल असे वाटल्याने विश्वास गुंदेकर यांनी त्याला तत्काळ खाली उतरविले व घरी घेऊन आले. अमोल याची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांनी याची खबर दापोली पोलिस ठाण्यात दिली. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस फौजदार बुरटे करीत आहेत.
दापोली-वेळवी येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या
तालुक्यातील वेळवी, कलानगर येथील अमोल गुंदेकर या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या
Similar Posts
View All
दापोली आगाराचा भोंगळ कारभार: मद्यधुंद चालकामुळे वारकऱ्यांचा जीव धोक्यात, भाजपची निलंबनाची मागणी
शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
मालगुंडमध्ये कवी केशवसुतांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
सुनेच्या अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या ९१ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोलीच्या सविता मडिवाळ यांची शासनाकडून ‘आयडॉल शिक्षिका’ म्हणून निवड

Leave a Reply