रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन
दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने बंधन २०२१ महिला सप्ताह साजरा करण्यात येत आहे. गुरुवारी रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शक करण्यात आले.
त्यावेळी आरोग्यविषयक माहिती, महिलांनी घ्यावयाची काळजी, व्यायाम आणि आहाराचे महत्व इ . विषयांवर प्राध्यापिका सायली शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, जेसी सिद्धेश शिगवण आणि रामराजे नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.