दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या यूके पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मुख्याध्यापिका मारिया सारंग यांनी प्रशालेकडून भेटवस्तू व फूल देऊन सन्मान केला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम गैबी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका मारिया सारंग यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,

“ती आई आहे, ती ताई आहे,ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे, पण याआधी ती एक स्त्री आहे आणि तिचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.”

असे बोलून त्यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमाचे पालक व सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.