दापोलीत शिवसेना-काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. विषय फक्त एवढाच आहे की, कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या आहेत.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र लढले होते. त्यावेळेला जागावाटप 11 राष्ट्रवादी आणि  6 काँग्रेस अशाप्रकारे केलं गेलं होतं. 11 जागांपैकी पैकी केवळ चार जगांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. तर सहा पैकी काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले. सत्तेपासून एक जागा दूर असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी पासून दूर झाली आणि शिवसेनेबरोबर आघाडी करून सत्तेवर आली.

यंदाचं गणित पूर्णताः बदललेलं आहे. शिवसेना आणि काँग्रेसची या निवडणुकीमध्ये आघाडी होणार आहे. शिवसेना काँग्रेसला सहा जागा देऊ करत आहे तर काँग्रेस सात जागांची मागणी करत आहे. याच विषयावर आघाडी जाहीर होत नाहीये. जागावाटपाचा तिढा सुटल्यावर दोन्ही पक्षाचे नेते पत्रकार परिषद घेऊन आघाडीची औपचारिक घोषणा करतील.

जनत सुज्ञ – आ. योगेश कदम

दापोलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस तर मंडणगडमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि आरपीआय एकत्र लढणार आहेत. आमदार योगेश कदम यांनीच याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. दापोली आणि मंडणगड ची जनता सुज्ञ आहे. येत्या निवडणुकीमध्ये ती शिवसेनेला विजयी करेल, असा विश्वास देखील योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*