रत्नागिरी : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी निसार दर्वे, जमुरत अलजी, सलाउद्दीन शिरगावकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

मुस्लिम ओबीसी करिता सतत लढणारी संघटना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनची महत्वाची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे ॲार्गनायझेशन चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती.

या बैठकीच्या सुरूवातीला मुस्लिम ओ बी सी समाजातील दिवंगत स्वर्गीय प्रा. आवटे, डॉ. एम.डी. शेकासन, रशीद साखरकर, अली साहब अलजी, इरशाद काझी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्याच प्रमाणे ॲार्गनायझेशनचे माजी जिल्हाध्यक्ष अमजद बोरकर यांची जिल्हा बॅंकेवर संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हा कार्यकारिणीवर नवीन नियुक्त्या जाहीर करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष निसार दर्वे, सलाउद्दीन शिरगावकर, जमुरत अलजी सरचिटणीस रहीम दलाल, रमजान गोलंदाज, सचिव जमीर खलफे, शब्बीर भाटकर, इस्माईल मुकादम, अशकुर संगमेश्वरी, कायदेशीर सल्लागार ॲड. खदीजा प्रधान व सल्लागार शेख अहमद हुश्ये यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी जाहीर केली. त्याच बरोबर जिल्ह्यातून आणखी नियुक्त्या लवकरच होणार असल्याचेही शेकासन म्हणाले.

कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ॲार्गनायझेशनचं काम पोहचवावं, असे शब्बीर अन्सारी यांनी म्हटलं आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या बैठकीचं प्रस्ताविक जमुरत अलजी यांनी केले तर आभार निसार दर्वे यांनी मानले. अमजद बोरकर यांनी सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करत नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक व पत्रकार बाळ पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांबरोबर डॉ. सलमा शेख, मुजीब जांभारकर, इम्रान सोलकर, दिलावर गोदाड, शकील कोलथारकर, खालिद तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते