अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे.

सुदैवाने या दोन्ही महिला बचावल्या आहेत. पण यामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील साकीनाका येथील काहीजण सहकुटुंब अलिबागला फिरायला आले होते. वरसोली समुद्रकिनारी फिरत असताना त्यातील सुजाता नारकर व सुरेखा पाणीकर या दोन महिला पॅरासेलींग करण्यासाठी गेल्या.

त्या पहिल्यांदाच पॅरासेलींगचा अनुभव घेत होत्या. पॅरासेलींग करताना अचानक दोर तुटल्याने त्या दोघी खाली पाण्यात कोसळल्या त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोटीवरील जीवरक्षकांनी दोघींनाही सुखरूप बाहेर काढले.