रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

राज्यात कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ झालेली असून ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे.

या कारणास्तव शासनाने 24 डिसेंबर 2021 च्या च्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन 30 डिसेंबर 2021 अन्वये सुधारीत निर्बंध लावले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात Level-3 चे निबंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधानुसार जिल्ह्यात आठवडी बाजार सुरु करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते. आठवडी बाजार सुरु करण्याबाबत निर्बंध कायम होते.

त्यानंतर शासनाकडील वेळोवेळीच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने काही निर्बध शिथील करण्यात आले होते. तर काही निर्बध वाढविण्यात आले होते.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ झालेली असून ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे.

त्या धर्तीवर शासनाने 24 डिसेंबर 2021 व 30 डिसेंबर 2021 अन्वये अतिरिक्त निर्बंध लागू केलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटचा प्रसार होऊ नये याकरीता अधिकची काळजी म्हणून काही निर्बध लावणे आवश्यक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी कोणतीही पुर्व परवानगी न घेता आठवडीबाजार सुरु केलेची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव यामध्ये वाढ होऊ नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करणेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत या आदेशान्वये बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

याकामी शहरी भागात अंमलबजावणी होते आहे अगर कसे? याबाबत सर्व मुख्याधिकारी यांनी कार्यवाही
करणेची आहे. तर ग्रामीण भागात अंमलबजावणी होते आहे अगर कसे? याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांनी कार्यवाही करणेची आहे.

यापूर्वी संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले कोराना निर्बंंध आदेश / मार्गदर्शक सूचना व निर्बध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

स्ह आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी लागू राहील. (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) असे आदेशात नमूद आहे.