सुप्रसिद्ध वकील विनय गांधींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची अकाली अखेर

रत्नागिरीतील सरकारी वकील व बहुआयामी व्यक्तिमत्व ऍड. विनय गांधी यांनी कोल्हापूर येथे आज अखेरचा श्वास घेतला. विनय गांधी यांच्या अकाली दुःखद निधनाच्या बातमीने धक्का बसला.

विनय सुरवातीच्या काळात माझे सिनिअर ऍड. केतन घाग यांचे ऑफीसमध्ये ज्यूनिअर म्हणून काम पहात होते. त्यानतंर माझ्याकडे अधूनमधून येवून मला मदत करीत असत.

जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत असता मेहनत, चांगली तयारी, योग्य संदर्भ, प्रामाणिक प्रयत्न व मांडणी याद्वारे त्यानी फौजदारी कामातील शिक्षेचे प्रमाण दखल घेण्या इतपत वाढविले.

विनय उत्तमरित्या बुद्धीबळ खेळत असत. आंतररास्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी आपली मोहर उमटविली. कोणत्या तरी चित्रपटात त्यानी भूमिका केल्याचे सांगतात.

ज्योतिष हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या कुंडल्या पाहून ग्रहांचा हिशोब मांडून भाविष्य सांगत असत. पंरतु विनय यांना त्यांच्या कुंडलीतील ग्रहानी अखेर चकविले हे खर.

कार्यतत्पर स्वभाव, मिश्किल वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन, हसरा व आनंदी चेहऱ्याच्या विनय गांधी यांचे भविष्य अर्ध्यावरच राहीले याविषयी मनस्वी वाईट वाटते. चांगली व भली माणस अर्ध्या वाटेवरून गेली की खरोखरच उदास वाटत.

– ऍड. विलास पाटणे, रत्नागिरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*