चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच चिपळूणमधील नामांकित व्यापारी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व संजय रेडीज यांचे गुरुवारी दिनांक 09 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झालं.
त्यांच्या निधनाने चिपळूण, रत्नागिरी आणि संपूर्ण सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय रेडीज यांनी आपल्या कार्यकाळात चिपळूण अर्बन बँकेच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे बँकेने प्रगती साधली आणि स्थानिक पातळीवर ग्राहकांचा विश्वास संपादन केला.
रत्नागिरी जिल्हा बँकेतही त्यांनी संचालक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि ज्ञान यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मान-सन्मान मिळाला.
व्यापारी म्हणूनही त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने आणि कार्यकुशलतेने चिपळूण परिसरात विशेष स्थान निर्माण केले होते.
संजय रेडीज यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक आधारस्तंभ हरपला आहे.
