अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान; गुन्हा दाखल

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथे एका सोळा वर्षे चार महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाभोळ येथील दाभोळकरवाडी क्रिकेट मैदानाच्या स्टेजजवळ डिसेंबर २०२१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एका अल्पवयीन बालिकेसमवेत तिच्या संमतीशिवाय शरीर संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार दाभोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर या पीडित अल्पवयीन बालिकेने २७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

या संदर्भात आरोपी कुंदन राजाराम दाभोळकर (२३) याच्या विरोधात दाभोळ पोलीस स्थानक येथे सीआरपीसी १०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या स.पो.नि. हिरेमठ करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*