देशात साजऱ्या होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाला पाठिंबा देण्याकरिता दापोली येथील पत्रकारांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण नुकतेच उत्साहात पार पडले. वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना दापोलीतील पत्रकारांच्यावतीने अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली
हे वृक्षारोपण रविवारी 7 ऑगस्ट रोजी जालगाव सुतारकोंड बौद्धवाडी स्टॉप ते उंबर्ले रस्त्यावर पार पडले. यामध्ये ऑक्सिजन देणा-या झाडांचे वृक्षारोपण करून पुढील पिढीला झाडे लावण्याबाबतचा संदेश देत प्रोत्साहन व देशाच्या स्वातंत्र्या करिता प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी दापोलीतील पत्रकार मनोज पवार, शैलेंद्र केळकर, शिवाजी गोरे, यशवंत कांबळे, संदेश राऊत, अजित सुर्वे, सत्यवान दळवी, मंगेश शिंदे, दीपक सूर्यवंशी, महेश महाडिक, प्रशांत परांजपे, विशाल बोरघरे, ज्योती बिवलकर, शमशाद खान, सुरेश जोशी, समीर पिंपळकर आदी पत्रकार उपस्थित होते.
यांच्यासह दापोली सायकलींग क्लबचे स्वप्निल जोशी, अंबरीश गुरव, संदीप भाटकर, सुरज शेठ, विनय गोलांबडे, केतन पालवणकर, प्रशांत पालवणकर, सर्वेश बागकर, स्नेहा भाटकर, संचिता भाटकर आणि सहकारी उपस्थित होते.