रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची बदली; बाबूराव महामुनी यांची नवीन नियुक्ती

रत्नागिरी : जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी बाबूराव महामुनी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यात उपअधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशा विविध पदांवर काम केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी अडीच वर्षे उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या सहकार्यशील आणि सर्वांना समजून घेणाऱ्या स्वभावामुळे त्या सर्वसामान्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते, ज्यामुळे त्यांची एक प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती होती.

त्यांच्या नवीन कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्या छत्रपती संभाजीनगर येथील गुप्तवार्ता विभागात आपली जबाबदारी सांभाळणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*