दापोली : तालुक्यातील खेर्डी येथे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. मुंबईहून उंबर्ले येथे धार्मिक पूजेसाठी येणाऱ्या या वाहनातील प्रवाशांना हा अपघात झाला, ज्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले, तर 5 जणांना किरकोळ दुखापती झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.