खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहतूक दस्तूरी मार्गे वळवली

दापोली : खेड-दापोली राज्य मार्ग क्र. 162 वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

विशेषतः दापोली तालुक्यातील वाकवली येथे हे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

अवजड वाहनांच्या आगमनामुळे कोंडी अधिक गंभीर होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे.

स्थानिक वाहनचालकांना आणि दापोलीला येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी केले आहेत.

वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि जनतेला माहिती देण्यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 अन्वये वाहतूक चिन्हे उभारण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत.

यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

त्यानुसार, 10 जून 2025 पर्यंत खेड-दापोली मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक खेड- दस्तुरी- पट्टणकोडोली- पालगड- सोंडेघर मार्गे दापोलीकडे आणि दापोलीकडून खेडकडे वळविण्यात येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*