दापोली : दापोली ग्रामीण आणि मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.
या स्पर्धेत कोळबांद्रे येथील नितीन लोखंडे यांना यंदाचा ‘मानाचा शाहीर’ किताब मिळाला. त्यांना ५,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कोळबांद्रे येथील काळकाई देवी कलामंच यांनी पटकावला. त्यांना २५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह मिळाले.
द्वितीय क्रमांक कुंभवे येथील खेमेश्वर नृत्य कलापथकाने मिळवला, ज्यांना १५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
तृतीय क्रमांक नवशी येथील खेमेश्वर नृत्य कलापथकातील गणेश चोरगे यांनी मिळवला, त्यांना १०,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह मिळाले.
याशिवाय, उत्कृष्ट गायक म्हणून कुंभवे येथील ओमसाई नृत्यकलापथकातील अजित गोवले यांना २,००० रुपये आणि चषक, तर उत्कृष्ट वादक म्हणून कुंभवे येथील खेमेश्वर नृत्य कलापथकातील पारस हुमणे यांना २,००० रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत दापोलीतील अनेक नामवंत शाहिरांनी सहभाग घेतला, ज्यात उंबर्ले येथील कुरकुलाई देवी कलामंचाचे शशिकांत गोठणकर, स्वराज प्रतिष्ठान नृत्यकलापथकाचे नरेंद्र मांडवकर, गिम्हवणे येथील श्रीराम नृत्यकलापथकाचे अशोक पवार, चिंचाळी विसापूरचे राकेश गौरत, किन्हळ येथील श्रीकृष्ण कलामंचाचे पप्प्या जोशी, घडवलेवाडी आपटी येथील जयहनुमान नृत्यकलापथकाचे संदीप आग्रे आणि होडखाड येथील ओमसाई नृत्यकलापथकाचे अजित गोवले यांचा समावेश होता.
या स्पर्धेच्या निमित्ताने दापोलीतील ज्येष्ठ शाहिरांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शंकर भारदे, अनंत मांडवकर आणि प्रभाकर चोरगे यांनी जाखडी नृत्यकला सातासमुद्रापार पोहोचवून तिला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
याशिवाय, करजगाव येथील साईभक्त नाचमंडळाने महिलांचे पारंपरिक टिपरी नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. जालगाव येथील शुक्रतारा कलामंचानेही यात सहभाग घेतला.
या स्पर्धेचे आयोजन रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रुपेश बेलोसे, अक्षय फाटक यांच्या पुढाकाराने झाले.
यावेळी सतीश मोरे, सुर्यकांत दळवी, केदार साठे, जया साळवी, सचिन होडबे, अजय कदम, साधना बोत्रे, सुनील दळवी, निलेश शेठ, विवेक इदाते, मिलिंद शेठ, धीरज पटेल, अतुल गोंदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वीरेंद्र लिंगावळे, अमोल तांबे, स्वरूप महाजन, विकास लिंगावळे, अमित जाधव, सोमेश शिगवण, पंकज भाटकर, विराज खोत, नानू भडवळकर, हर्षल मोरे, नाथा वरवडेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला आणि दापोलीतील लोककलेचे वैभव पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
