ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आगामी निवडणुकांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहेपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य सरकारची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. कारण 21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे. तसेच या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकत्रित 19 जानेवारीला होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. आधी ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या प्रभागात खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असून राज्य सरकारनं या निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली विनंती आयोगानं फेटाळली आहे.