रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सर्वपक्षीय सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. तानाजी चोरगे तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व असल्यामुळे निवडीची औपचारीकता बुधवारी पूर्ण झाली.
जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
सकाळी 11 वाजता बँकेच्या सभागृहात निवडणुक प्रक्रियेला सुरवात झाली. सहकार पॅनेलतर्फे डॉ. चोरगे यांनी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदासाठी बाबाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
डॉ. चोरगे यांना सुचक म्हणून जयवंत जालगावकर तर अनुमोदक म्हणून सुधीर कालेकर यांनी तर बाबाजी जाधव यांना सुचक म्हणून शेखर निकम आणि अनुमोदक म्हणून संजय रेडीज जोते. अर्ज छाननीनंतर दोन्ही अर्ज ग्राह्य ठरवण्यात आले.
बँकेच्या 21 पैकी 14 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर निवडणुक झालेल्या 7 पैकी 5 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे सहकार पॅनलने 19 जागांवर वर्चस्व राखले.
सर्वपक्षीय पॅनेलविरोधातील दोघेजणं निवडून आले असले तरीही त्यातील अजित यशवंतराव यांनी डॉ. चोरगे यांनाच पाठींबा दर्शविला होता.
त्यामुळे निवडीची औपचारिकताच शिल्लक होती. त्यानुसार कार्यवाही झाली. बिनविरोध निवडून आल्यानंतर सर्वच संचालकांनी डॉ. चोरगे यांच्यासह बाबाजी जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
दरम्यान निवडून आल्यानंतर डॉ. चोरगे यांनी भविष्यात बँकेचा कारभार जास्तीत जास्त चांगला चालविण्यासाठी पावले उचलण्याचं आश्वासन दिले.