दिनांक 23 ऑगस्ट रोजी आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे 14 वर्षाखालील मुले-मुली या गटातील व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
क्रीडा व युवक संचनालय पुणे, संचलित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी यजमानपद बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आकाराम महिंद, शिक्षक सत्यवान दळवी, शैलेश वैद्य, शिक्षिका जयश्री रिंगणे, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मधुकर पवार व प्रकाश महाडिक यांच्यावर देण्यात आली.
प्रशाळेतील मुख्याध्यापक आकाराम महिंद यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पंच, क्रीडाशिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व खेळाडू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन आगरवायंगणी संस्थेचे अध्यक्ष रमेश पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली.
दापोली तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तालुका समन्वयक अविनाश पाटील व अर्जुन घुले, प्रशाळेचे मुख्याध्यापक आकाराम महिंद, रमेश पवार (संस्था अध्यक्ष), शांताराम टेमकर (तंटामुक्ती अध्यक्ष), सुनील बेंडल (संचालक), विजय महाडिक (पोलीस पाटील), ग्रामस्थ प्रकाश गुरव, शरद पवार, दत्तात्रय खांडेकर, संदीप खांडेकर व इतर मान्यवर-ग्रामस्थ उपस्थित होते.
पंच प्रमुख सत्यवान दळवी, प्रदीप शिगवण, वसिवुल्ला दरवाजकर, राजेंद्र देवकाते, विकास पाटील,अश्फाक खान, कीर्तिकुमार नाचरे, राजेश महाडिक, दिपक पवार, संदीप क्षीरसागर, मंजिरी शितूत, वृषाली यांना इतर शिक्षकांनी उत्कृष्ट सहकार्य केले.