उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली, सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील लाभले, यांच्या हस्ते ह्या कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच सावंतवाडी कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी प्राचार्य डॉ. रंजित देव्हारे, कृषि सहाय्यक सीमा घाडी, इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, महिला बचत गट अध्यक्ष खोपकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.