इन्सुली गावात सुरू झाले ‘कृषि माहिती केंद्र’

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती संबंधित वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांस्कृतिक सभागृह इन्सुली, सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील लाभले, यांच्या हस्ते ह्या कृषि माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच सावंतवाडी कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी प्राचार्य डॉ. रंजित देव्हारे, कृषि सहाय्यक सीमा घाडी, इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच कृष्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चराटकर, महिला बचत गट अध्यक्ष खोपकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.

कृषिच्या ऋषिला भावपूर्ण श्रध्दांजली!

जागतिक किर्तीचे शेती शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. कृषि संशोधक असलेल्या एम. एस. […]

कृषी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अझोला निर्मिती व कंपोस्ट प्रकल्पाची उभारणी

विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अझोला निर्मिती आणि कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या विद्यार्थ्यांतर्गत कृषी माहिती केंद्र व रान भाजी प्रदर्शन

दि.१५ ऑगस्ट, ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मधील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम मधील ‘कृषीरत्न’ ह्या गटातील विद्यार्थ्यांनी जि. प. प्राथमिक शाळा, माणगाव तर्फे वरेडी येथे कृषी माहिती केंद्र व रान भाजी प्रदर्शनाचे आयोजन केले.