दि.१५ ऑगस्ट, ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली मधील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम मधील ‘कृषीरत्न’ ह्या गटातील विद्यार्थ्यांनी जि. प. प्राथमिक शाळा, माणगाव तर्फे वरेडी येथे कृषी माहिती केंद्र व रान भाजी प्रदर्शनाचे आयोजन केले.

ह्या वेळी गावचे सरपंच कराले मॅडम , उपसरपंच ठोकरे, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राध्यापक घुळे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी , मराठी शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम कृषिरत्न गटातील रजत बेटकेकर, ऋत्विक उमते, आयुष गुरव, अब्दुल नाडकर, संभा मराठे, ललित गावडे, प्रथमेश वेलिप, प्रणव शेळके ह्यांनी सादर केला. ह्या कार्यक्रमाचा हेतू कृषी क्षेत्राबद्दल लोकांना उपयुक्त माहिती देणे, त्यांना शेतीचे महत्व पटऊन देणे तसेच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नैसर्गिक उपलब्ध होणाऱ्या रान भाज्यांची माहिती देणे असे होते. तरी कृषिरत्न गटाने विद्यापीठाने तयार केलेल्या विविध भाताच्या आणि कडधान्याच्या जाती, अवजारे, नैसर्गिक खते, कीटक नाशक, तणनाशक, कोंकण विजय बंधारा व शेततळी ह्यांचे मॉडेल, कृषी माहिती पुस्तके आणि विविध प्रकारच्या रान भाज्या ह्यांचे मार्गदर्शन लोकांना केले.

ह्या कार्यक्रमा साठी प्राथमिक शाळा,ग्रामपंचायत तसेच गावचे नागरीक ह्यांचे भरगोस प्रतिसाद मिळाले.
तसेच कृषिरत्न गटाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनमध्ये विवध प्रकारच्या स्पर्धेचे आणि ७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले. ह्या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ह्या स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कृषिरत्न गटाकडून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.गावामध्ये कृषी क्षेत्राबद्दल जन जागृती केल्यामुळे प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत ह्यांच्या कडून कृषिरत्न गटाचे कौतुक व आभार मानले गेले आणि पुढील वाटचालीसाठी कृषिरत्न गटातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

गावामध्ये कृषी क्षेत्राबद्दल जन जागृती केल्यामुळे प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत ह्यांच्या कडून कृषिरत्न गटाचे कौतुक व आभार मानले गेले आणि पुढील वाटचालीसाठी कृषिरत्न गटातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.