विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अझोला निर्मिती आणि कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले.

दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर यांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. आपण उत्पादन वाढविण्याच्या फायद्यासाठी आपले व सोबत आपल्या पुढच्या पिढीचे आरोग्य धोक्यात घालत आहोत. यासाठी आपण रासायनिक पेक्षा कमी खर्चात कंपोस्ट खत निर्मिती कशी करु शकतो? जमिनीचा कस कसा वाढवु शकतो? कंपोस्ट खताचे फायदे? ते करत असताना घ्यावयाची काळजी याबद्दल सर्व गोष्टी सांगत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले.

त्याचबरोबर अझोला या पाण्यावर वाढणाऱ्या वनस्पतीचे उत्पादन कसे घेतले जाते? त्याचे फायदे कोणते आहेत? ती कश्या प्रकारे वापरली जाते? तीचे कोणकोणते गुणधर्म आहेत? या सर्वांची माहिती कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कृषी मित्र गटाने होडावडे येथील शेतकऱ्यांना दिली. तसेच या प्रात्यक्षिकाबद्दल असलेल्या अडचणी व शंका याचे सुध्दा निरसन केले.

यावेळी येथील शेतकरी अजित नाईक, महेश परब, सदानंद भगत, कृषी मित्र गटातील विद्यार्थी सतिश वाघमारे, सिध्दांत ओव्हाळ, विशाल सरुळे, उस्मान डबीर, कार्तिकेश भुवड, जोशीराम जाटोथ, वामशी कोड्रा, कृष्णा रेड्डी, जगजीवन पोलाकटला, इ. उपस्थित होते.

हे सर्व प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. जी. देसाई सर, वनस्पती रोगशास्र विभाग प्रमुख डॉ. मकरंद जोशी सर, रोगशास्र विषय विशेषज्ञ डॉ. राजेश राठोड सर, पशु व दुग्धशास्र विषय विशेषज्ञ डॉ. एन. प्रसादे सर, कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे सह संचालक डॉ. व्ही. जी. नाईक सर तसेच फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला विभागाचे ए. ई. एस. डॉ. एम. सणस सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.