corona update

रत्नागिरीत एका दिवसात 35 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 4 दापोलीत

आज सापडलेल्या 35 जणांमध्ये राजापूर येथील 1, कलंबणी मधील 4, रत्नागिरी मधील 15, कामथे येथील 10, लांजामध्ये 1 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.

corona update

जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्ण, तर दापोली पिसई येथील एकाचा मृत्यू

जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण मु.पो. पिसई कुंभारवाडी ता. दापोली येथील असून त्याचे वय 64 आहे. त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. रुग्णाला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

corona update

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 19 जणांचा मृत्यू

कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.

कोकणनगर कोरोना बाधित क्षेत्र जाहीर

रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. असा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  त्या परिसरामधील भाग Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) जाहिर करणे आवश्यक आहे.