रत्नागिरी : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे भावनिक आवाहन केले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आज (२२ जुलै) एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे हा धनादेश सादर करत मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने अनेकजण शुभेच्छापर जाहिराती आणि बॅनर लावतात.
मात्र, हा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, ज्यामुळे राज्यातील जनतेला थेट लाभ होईल, असे आवाहन फडणवीस यांनी केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने सर्व संचालकांच्या सहमतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला.
आज हा धनादेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट आणि उपव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांनी ॲड. दीपक पटवर्धन आणि पतसंस्थेच्या सामाजिक दायित्वाच्या भावनेचे कौतुक केले.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची देदीप्यमान वाटचाल आणि सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था नेहमीच सामाजिक जाणिवेतून नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त उपक्रम राबवत असते.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांचे योगदान दिले.
यामुळे महाराष्ट्राच्या प्रगल्भ आणि लोकप्रिय नेतृत्वाचा वाढदिवस सामाजिक दायित्वासह साजरा केला.
या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट आणि उपव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी ॲड. दीपक पटवर्धन आणि पतसंस्थेच्या सामाजिक दायित्वाच्या भावनेचे कौतुक केले.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची देदीप्यमान वाटचाल आणि सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.