दापोली : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं.१ येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी मुख्याध्यापक संजय मेहता यांचे हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण केले गेले. यावेळी मेहता यांनी कुष्ठरोग, स्वदेशी चळवळ आणि महात्मा गांधी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

तर सुरेश पाटील यांनी  महात्मा गांधी यांची एकादश वृत्ते कशी उपयुक्त आहेत हे सांगितले. यावेळी समीर ठसाळ, संजय चोरमले उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थी ऋग्वेद लोवरे याने सर्वांना कुष्ठरोग निवारण शपथ दिली.

दरम्यान भोपण गावचे रहिवासी अमेय उजाळ, स्नेहल उजाळ या दाम्पत्यांनी शाळेतील मुलांना आपल्या भविष्याला नवा आयाम देण्यासाठी, प्रभावी शिक्षण, तंत्रज्ञान, व्यावहारिक प्रकल्प, रोबोटिक्स आणि कोडींग विषयक प्रात्यक्षिकं दाखवत आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात स्वत:ची ओळख कशी निर्माण करता येईल या विषयी मार्गदर्शन केले.

शेवटी मुलांना दुध आणि बिस्किटे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थ, शिक्षक महेश शिंदे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.