मुंबई -राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहे.
राज्य सरकारची नवी नियमावली
▪️लग्न सोहळा बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
▪️सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम किंवा मेळाव्या देखील बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
▪️अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
▪️राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
▪️आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील