दापोली:- राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांना अत्याचार करण्याची धमकी देणाऱ्या पडळकर्याच्या कार्यकर्त्याचा जिल्हा उपाध्यक्ष संख्याताई पोवार यांनी समाचार घेतला आहे.पक्षाने आम्हाला ताकत दिली आहे ती अन्याय – अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी दिली आहे त्यामुळे धमक्यांना घाबरून आम्ही घरात बसून राहणार नाही.

आज दापोली पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी च्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर याना धमकी देणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून युवती कडून निवेदन देण्यात आले ह्या वेळी युवती राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हा उपाध्यक्ष सौ. संख्याताई पोवार,राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका अध्यक्ष कु. मृणाली साळवी,राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका उपाध्यक्ष कु.कोमल चव्हाण,शहर अध्यक्ष सौ श्वेता मेहता,कु कमल फुरुसकर व पदाधिकारी उपस्थित होते.