चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.

या उपक्रमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच हजार ग्रामीण विद्यार्थिनींना लाभ झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

युनायटेड इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील आणि न्यू इंग्लिश हायस्कूल आंबडसचे मुख्याध्यापक चोरगे यांच्यासह शिक्षक आणि स्टार युनियन दाय-इचीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी एरिया हेड समीर शिंदे, चिपळूण शाखा अधिकारी संकेत मेहता, दीपक जाधव आणि महिला कर्मचारी आकांक्षा दळवी, शिल्पा सावर्डेकर, मंजिरी चव्हाण, ऋतुजा खानविलकर यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

विद्यार्थिनींना संकेत मेहता आणि आकांक्षा दळवी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.