महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेला निकाल उद्या दुपारी 1 वाजता खालील वेबसाइटवर पाहता येणार आहे.

www.sscresult.mkcl.org
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.mahasscboard.in

दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी 9 लाख 75 हजार 894 मुलं तर 7 लाख 89 हजार 894 मुली होत्या. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

3 मार्च ते 23 मार्च 2020 या दरम्यान परीक्षेचं वेळापत्रक होतं. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं भुगोलाचा पेपर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रद्द केला होता.

गेल्या वर्षी तुलनेत यंदा निकाल दिड महिना उशीराने लागत आहे. 2019 साली 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता. कोरोना सर्वच क्षेत्राची घडी विस्कळीत केली आहे.