सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात

रत्नागिरी : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात झाली.

या यात्रेच्या मुख्य आयोजकांमध्ये ॲड. जया उदय सामंत, तसेच धर्मसिंह चौहान, विनिता गोखले, निलेश मिराजकर, भुवना महागावकर, राजेश भुर्के, प्रमोद खेडेकर आणि प्रवीण लाड यांचा समावेश आहे.

पहिल्या दिवशी बुधवारी, १८ जून रोजी अंबर हॉल, टीआरपी येथे सायंकाळी ६ ते ८:३० या वेळेत रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा पार पडला.

हजारो भक्तांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग अवशेषांचे दर्शन घेतले, ज्यांना १०२६ मध्ये महंमूद गजनीने नष्ट केलेल्या शिवलिंगाचा भाग मानला जातो. अग्निहोत्री ब्राह्मण कुटुंबाने हे पवित्र अवशेष सुरक्षित ठेवले होते.

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी सत्संग, भजन आणि मार्गदर्शित ध्यान सत्र झाले. आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांनी या कार्यक्रमांचे यशस्वीपणे संचालन केले.

“ही यात्रा भक्ती आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक आहे,” असे प्रशिक्षक दर्शक हाथी यांनी यावेळी नमूद केले.

गुरुवारी १९ जून रोजी मराठा मंडळ हॉल, माळनाका येथे सायंकाळी ६ ते ८:३० वाजेपर्यंत दर्शन सोहळा होणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्य आयोजक जया उदय सामंत यांनी केलं आहे.

वैदिक धर्म संस्थान आणि आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरीनंही सर्व भाविकांना या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ही यात्रा १५ जून ते ६ जुलै २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून प्रवास करणार असून, भारताच्या समृद्ध अध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवत आहे.

Advertisement

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*