तर राजकारण सोडणार; अरविंद केजरीवाल यांचे भाजपला थेट आव्हान

नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीतील महापालिका निवडणुका टळण्याचे संकेत आहेत. यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. जर आताच दिल्लीतील महापालिका निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपचा विजय झाला तर, मी राजकारण सोडेन, असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं.

दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याबाबतच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी दिल्यानंतर, आम आदमी पक्षानं भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. निवडणुकांमध्ये पराभव होण्याच्या भीतीनं हा निर्णय घेतल्याचं आम आदमी पक्षानं म्हटलं होतं. आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली महापालिका निवडणुका टाळणे हा शहिदांचा अवमान आहे. पराभवाच्या भीतीने भाजप महापालिका निवडणुका घेण्याचे टाळत आहे. भविष्यात हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही घेणार नाहीत, असं केजरीवाल म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*