दापोली : राज्यस्तरावरील MHT CET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत शारदा क्लासेस दापोलीमध्ये CET क्रॅश कोर्स केलेल्या यश देवघरकर याने MHT CET (PCB) मध्ये 99.51 percentile आणि विराज कळेकर याने MHT CET (PCM) मध्ये 95.97  मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. हे विद्यार्थी त्या त्या विभागात शारदा क्लासेस मधून प्रथम आले आहेत.

ह्या वर्षी शारदा क्लासेस दापोली मधून CET PCM साठी 33 तर CET PCB साठी 43 विद्यार्थी असे एकूण 76 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 7 विद्यार्थ्यांनी 90%tile पेक्षा जास्त, 22 विद्यार्थ्यांनी 80%tile ते 90%tile गुण, 12 विद्यार्थ्यांनी 70%tile ते 80%tile गुण प्राप्त केले आहेत.

त्यातून CET PCB मधील यश देवघरकर 99.51%tile, जय जाधव 97.54%tile, रोशनी घाडगे 94.14%tile ह्यांनी 90%tile पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तसेच अजून 13 विद्यार्थ्यांनी 80%tile पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.

CET PCM मधील विराज कळेकर 95.97%tile, विश्व जाधव 92.73%tile, यश गुरव 92.25%tile, संस्कार कदम 91.06%tile ह्यांनी 90%tile पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत तसेच अजून 9 विद्यार्थ्यांनी 80%tile पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं अभिनंदन होत आहे.