राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी दापोलीच्या शालिनी भुवड हिची निवड

दापोली : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर तायक्वांदो असोसिएशनच्यावतीने ३३वी महाराष्ट्र राज्य क्योरोगी व ९वी पुमसे अजिंक्यपद राज्य स्पर्धा दि. २ ते ४ डिसेंबर रोजी ग्रीन पॅरडायस रिसॉर्ट, वसई या ठिकाणी महाराष्ट्र तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर व राज्य तायक्वांदो सचिव संदीप ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 500 जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी तायक्वांदो स्पोर्ट्स फाऊंडेशन दापोली क्लबची खेळाडू शालिनी विजय भुवड (वजनी गट 53 की. खा.), रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

शालिनी भुवड हिचा शुभेच्छा व सत्कार समारंभाचा कार्यक्रम नुकताच पेन्शनर्स हाॅल दापोली येथे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल विष्णु भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्रमुख प्रशिक्षक प्राजक्ता माने, तायक्वांदो क्लबचे सर्व खेळाडू, पालक व आदी मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*